सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा एमायडीसी पश्चिम महाराष्ट्रातील गोल्डन ट्रॅगलमधील उत्कृष्ट एमआयडीसी आहे मात्र 47 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या औद्योगिक वसाहतीला आज जे मंदीचे ग्रहण लागले आहे. यामध्ये कामगार चळवळीत कोणाची एकाधिकारशाही फोफावली आहे हे सर्वांना ठाऊक आहे. पंडित ओंटोमोटिव्ह बेकायदेशीर लिलाव देणाऱ्या वघेणाऱ्यांना कामगार उध्वस्त करायचा आहे काय? लोकप्रतिनिधी असाल म्हणून टाळूवरचे लोणी खाणार काय? असा सवाल खासदार उदयनराजे भोसले यांनी अप्रत्यक्षरीत्या आ. शिवेंद्सिंहराजे भोसले यांना केला.
साताऱ्यात पंडित ऑटोमोटिव्हच्या पाचशेहून अधिक कामगारांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सध्या गाजतो आहे .या कंपनीच्या जागेचा लिलाव आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेतला आहे या मुद्द्यांच्या अनुषंगाने खासदार उदयनराजे भोसले यांनी या वादात उडी घेत कामगार चळवळ चिरडाल तर खबरदार गाठ माझ्याशी आहे असा इशारा उदयनराजे यांनी दिला . येथील शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात सर्व कामगारांच्या उपस्थितीत उदयनराजेयांनी पत्रकारांशी संवाद साधत आपला संताप व्यक्त केला.जी जागा तब्बल 42 कोटी रुपयांची आहे त्या जागेचा लिलाव संबंधितांनी फक्त आठ कोटी मध्ये घेतला आहे. म्हणजे एमआयडीसीचे अधिकारी संबंधित बँक व लिलाव घेणाऱ्यांचे संग संगनमत स्पष्ट दिसून येत आहे.
एमआयडीसीच्या प्रश्नावर मी बोलणार म्हणजे तुम्ही
षड्यंत्राचा आरोप करणार मात्र मी पोटतिडकीने बोलतो
You must be logged in to post a comment.