सातारा शहर व हद्दवाढ क्षेत्रातील विविध विकासकामांच्या नियोजनाबाबत उदयनराजेंनी घेतली अधिकाऱ्यांची बैठक

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा शहरातील व हद्दवाढ क्षेत्रातील विविध विकासकामांच्या नियोजनाबाबतीत आज अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना केल्या.

सातारा शहरातील वाढेफाटा चौक, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, अजंठा चौक, शिवराज चौक आदी ठिकाणाहुन सातारा शहरात प्रामुख्याने प्रवेश करण्यात येत आहे. पैकी अजंठा चौक, बॉम्बे रेस्टॉरंट चौक आणि वाढे फाटा चौक या ठिकाणच्या उड्डाणपूलाखालील राष्ट्रीय महामार्गाच्या जागेत, पुण्याच्या धर्तीवर, बागबगीचा, वॉकिंग ट्रॅक, व्हर्टीकल गार्डन, भाजी मंडई, पार्किंग, आर्टिफिशियल वॉटरफॉल,फाउंटन्स्, सार्वजनिक स्वच्छतागृह, आदी लोकोपयोगी सुविधा सुरु करण्याचा प्रयत्न इनोव्हेटीव्ह साताराच्या माध्यमातुन सुरु आहे.

सदरचा भाग आता पालिका हद्दीत आल्यामुळे, नगरपरिषदेने याठिकाणाचा भविष्यकालीन विचार करुन, योग्य ते प्रस्ताव शासनाकडे सादर करावेत अश्या सूचना यावेळी दिल्या.

इनोव्हेटिव्ह सातारा विषयी जलमंदिर पॅलेस, सातारा येथे बोलावण्यात आलेल्या आढावा बैठकीत उपस्थित अधिकारी आणि कार्यकर्ते यांना सूचना देताना सांगीतले की अजंठा चौक, बॉम्बे रेस्टॉरंट आणि वाढे फाटा चौक या ठिकाणी निर्माण करण्यात आलेल्या उड्डाणपूलांमध्ये, पुलाखालील मोठी जागा उपलब्ध झालेली आहे. या जागेमध्ये कोणतेही अवैध उद्योग होवू नयेत आणि जागेचा सुयोग्य वापर लोकोपयोगी कामामध्ये होण्यासाठी आम्ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास यापूर्वी वेळोवेळी विविध उपयुक्त प्रस्ताव सुचविलेले आहेत. तथापि सदरच्या पूला खालील जागा आम्ही हस्तांतरणास तयार आहोत, निधीची उपलब्धता करवून घेवून विविध उपक्रम सुरु करण्यास महामार्ग
प्राधिकरणाची हरकत नाही असे स्पष्ट करण्यात आलेले आहे.

आता सदरचा भाग नगरपरिषदेच्या हद्दीत आला आहे. याकामी उपयुक्त वैविध्यपूर्ण कामांचे प्रस्ताव तयार करुन, विविध उपक्रम सदर जागेच्या खाली सुरु करण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे. याठिकाणी कोणते उपक्रम अधिक चांगले ठरतील यासाठी सातारा जिल्ह्यातील आर्किटेक्ट असोसिएशन यांचेकडून, प्रकल्प चित्र तयार करण्याबाबत बैठकीत निर्णय घेण्यात आला. या ठिकाणी भाजी मंडई, पालिस चौकी, वाहनतळ,
सार्वजनिक स्वच्छतागृह, आदी लोकोपयोगी सुविधा नागरीकांसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी आपापल्या विभागातील अधिका-यांनी जाणिवपूर्वक प्रयत्न करावेत.

दरम्यान सातारा शहरानजीक असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या पूलांची स्वच्छता, सींसरोड वरील गटर स्वच्छता आणि साफसफाई आणि स्ट्रीट लाईट तातडीने सुरु करण्याच्या सूचना महामार्ग प्राधिकरणाला दिल्या आहेत.
स्थानिक प्राधिकरणाकडून प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आल्यावर, राज्य किंवा केंद्र शासनानाकडून तातडीने निधी सार्वजनिक कामासाठी उपलब्ध करुन घेणेचे प्रयत्न केले जातील..

error: Content is protected !!