सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्हा आणि परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गाळपाविना मोठ्या प्रमाणात ऊस उभा आहे, त्यामुळे संपूर्ण उसाचे गाळप होईपर्यंत कारखाने बंद करण्यात येऊ नयेत, आशा सक्त सूचना जिल्ह्यातील साखर कारखान्यांना देण्याची मागणी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पुणे येथे साखर आयुक्तांकडे केली आहे.
शुक्रवारी (दि.६) दुपारी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची भेट घेतत्यांनी मागण्यांचे निवेदन दिले आणि सविस्तर चर्चाही केली. ऊस उत्पादकांचा ऊस शेतात उभा असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी असून तो आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे गळीत हंगाम 2021- 22 अखेरीस सुरुवात होवूनही ऊस तुटून जात नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांना संपूर्ण ऊस तुटून जात नाही तोपर्यंत साखर कारखाने बंद करण्यात येऊ नयेत, यासाठी सक्त सूचना देण्यात याव्यात. तसेच कोणत्याही ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस गाळपाविना शेतात उभा राहू नये याची दक्षता साखर आयुक्तांनी घ्यावी अशी मागणी त्यांनी केली.
You must be logged in to post a comment.