सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : येथील तालीम संघ मैदानावर छत्रपती उदयनराजे मित्र समूहाच्या वतीने आयोजित दहीहंडीचा कार्यक्रमात खा. उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या हटके स्टाईलने सर्वांना इशारे करत हजारो युवकांची मने जिंकली.
दरम्यान, काही युवकांनी कोयता नाचवल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी दोन संशयित युवकांना ताब्यात घेतले आहे.
तालीम संघ मैदानावर आयोजित दहीहंडीचा कार्यक्रमाला रविवारी मोठ्या संख्येने खा. उदयनराजे भोसले यांचे समर्थक या कार्यक्रम ठिकाणी आले होते. या कार्यक्रमासाठी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी त्यांच्या हटके स्टाईलने सर्वांना इशारे करत हजारो युवकांची मने जिंकली. यावेळी त्यांना स्टेजवर दहीहंडी फोडण्याची कार्यकर्त्यांनी विनंती केली यावर त्यांनी स्टेजवर समोर असणारी दहीहंडी फोडून चाहत्यांची इच्छा पूर्ण केली. यावेळी त्यांनी दुतर्फा सुरू असलेल्या फटाक्यांच्या आतिषबाजीच्या समोरून रॅम्पवर वॉक करत युवकांना हात वारे करत युवकांचे मने जिंकली.
कार्यक्रमाच्या मैदानावर अनेक ठिकाणी युवक डॉल्बीच्या तालावर बेधुंद नाचत होते. यावेळी एका घोळक्यात एका युवक कोयता नाचवताना पोलिसांच्या निदर्शनास आला. हातात शस्त्र घेऊन सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण केल्याप्रकरणी संबंधित अज्ञात युवकांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
You must be logged in to post a comment.