सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारकरांच्या मनातला सातारा आपण मिळून घडवूया, अशी साद घालत खासदार उदयनराजे भोसले यांनी रविवारी सकाळी दहा वाजता जिल्हा बँकेच्या सभागृहात मनमोकळा संवाद मेळाव्याचे आयोजन केले आहे.
उदयनराजे यांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, नव्या पिढीला दिशा देऊया.”साताऱ्यात काही घडतच नाही,” “साताऱ्यात प्रगतीला वाव नाही,” अशा आशयाच्या पोस्ट तुम्ही सोशल मीडियावर पाहिल्या आणि केल्याही असतील. हे व्यक्त होणं स्वाभाविक असलं तरी मनापासून नसतं; कारण आपल्या साताऱ्यावर आपलं मनापासून प्रेम आहे. म्हणूनच आपण सर्वांनी मिळून साताऱ्याच्या जडण घडणीसाठी सक्रिय झालं पाहिजे. तुमच्या ज्या संकल्पना असतील, त्या कृतीत आल्या तर काय अशक्य आहे? हे काही रातोरात होणार नाही; पण व्यक्त तर झालंच पाहिजे ना? सोशल कमेंट्समधली नकारात्मकता झटकून असं पॉझिटिव्हली व्यक्त होणं चांगलंच ना? हेच सकारात्मक पाऊल आपण टाकतोय १७ ऑक्टोबर रोजी. तुमच्या-आमच्या मनातला सातारा निर्माण करण्यासाठी. नक्की या..असे आवाहन केले आहे.
You must be logged in to post a comment.