चोराच्या उलट्या बोंबा; उदयनराजेंचे शिवेंद्रसिंहराजेंना प्रतिउत्तर

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सर्वसामान्य जनतेसाठी आजपर्यंत आम्ही जीवन व्यथित केले आहे. काहींना आमची धडाडी आणि लोकप्रियता खुपत आहे. म्हणूनच कथित भ्रष्टाचाराचे बिनबुडाचे आरोप ते करत आहेत. कुणी कितीही उलट्या बोंबा मारत असले तरी त्या बोंबा मारणा-यांना समाजाने पुरते ओळखले आहे. असे प्रतिउत्तर खा. उदयनराजे भोसले यांनी केले.

प्रसिद्धी पत्रकात म्हटले की, उदयनराजे भोसले म्हणाले, शाश्वत विकासाच्या गप्पा ठोकणा-यांनी, चालवता आल्या नाहीत म्हणून दोन सहकारी बॅन्कांचे विलिनीकरण केले. तरीही उजळ माथ्याने हिंडणा-यांचा सहकारातील अचंबित करणारा शाश्वत विकास सभासद, नागरीकांनी पाहीला आहे. त्यांचे पोटात एक आणि ओठात एक या वैशिष्ठयाचा अनेकांना बसलेला झटका लोक विसरलेले नाहीत. म्हणून बेछुट, बेताल आरोप करुन, त्यांचा सुरु असलेला चारित्र हननाचा प्रयत्न यशस्वी होणार नाही.आम्ही त्यांच्या वक्तव्याला फारशी किंमतही देत नाही.

error: Content is protected !!