हद्दवाढ भागातील पाणीपुरवठा योजनेसाठी निधी उपलब्ध करुन देण्याची उदयनराजे यांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) :सातारा नगरपरिषदेच्या शाहुनगर, विलासपूर, पिरवाडी या वाढील हद्दवाढ भागातील नागरीकांसाठी सुमारे 35 कोटी रुपयांची, शाहुनगर पाणीपुरवठा योजना, राज्यशासनाबरोबरच केंद्रीय पेट्रोलियम, नैसर्गिक वायु, गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्री ना.श्री.हरदिपसिंह पुरी यांनाही आज भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे.

शाहुनगर योजना आणि कास बंदिस्त पाईपलाईनकरीता केंद्राच्या अमृत 02 योजनेमधुन निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे. अमृत किंवा तत्सम योजनेतुन केंद्राकडून निश्चितपणे लवकरच निधी प्रदान केला जाईल अशी ग्वाही यावेळी ना.हरदिपसिंह पुरी यांनी दिली आहे. समान आणि पुरेश्या दाबाने शहरवासियांना पाणीपुरवठा झाला पाहीजे अशी धारणा सातारा विकास आघाडीची नेहमीच राहीली आहे नव्याने समाविष्ट झालेल्या शाहुनगर, पिरवाडी, विलासपूर या भागातील आज मितीस सुमारे 1 लाख लोकसंख्या आहे.

शहर हददीत या भागाचा समावेश झाल्याने या भागाचा झपाटयाने विकास होणार आहे. बहुतांशी निवासी मिळकती असलेल्या या भागातील भविष्यातील विस्तारणा-या लोकसंख्येचा विचार करुन पुरेसा पाणीपुरवठा समान दाबाने होण्यासाठी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला नवीन योजना प्रस्तावित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे एमजेपीने सुमारे 35 कोटी रुपयांची शाहुनगर पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव राज्यशासनाकडे पाठवण्यात आलेला आहेच, तथापि निधी उपलब्धतेची कमतरता भासु नये म्हणून केंद्राच्या अमृत-2 योजनेमध्ये या योजनेचा समावेश करुन, ठोस व भरीव निधी केंद्राकडून प्राप्त करुन घेण्यासाठी आम्ही प्रयत्नात आहोत म्हणूनच आज ना.पुरी यांची भेट घेवून त्यांच्या कडे योजनेला मंजूरी देण्याबाबत मागणी केली आहे.

प्रस्तावाची छाननी करुन, जास्तीत जास्त निधी सातारा नगरपरिषदेला कसा प्रदान केला जाईल याचा निर्णय लवकरच घेतला जाईल असा शब्द देखिल ना.पुरी यांनी उदयनराजे यांना दिलेला आहे. सध्या चालु असलेल्या एमजेपीच्या पाणीपुरवठयाला संलग्न असलेल्या या योजनेमुळे, शाहुनगर, विलासपूर, पिरवाडी व परिसरातील सर्व नागरीकांना याचा मोठा लाभ मिळणार आहे पाणी म्हणजे जीवन आहे याची आम्हाला जाणिव आहे आणि या जाणिवेतुन आमचे सकारात्मकतेचे प्रयत्न नेहमीच राहीलेले आहेत. यापूर्वी शहराला पाणीपुरळा अपुरा पड़े नये म्हणून कास धरणाची उंची वाढवण्याचे काम हाती घेतले ते मार्च 2022 पर्यंत पूर्ण होत आहे. कास बंदिस्त पाईपलाईनसाठीही अमृत योजनेमधुन निधी मिळणेबाबत प्रस्तावित केलेले आहे. शाहुपूरी भागासाठी कण्हेर 24 बाय 7 योजनेचा नुकताच शुभारंभ करण्यात आला आहे. आता शाहुनगर, विलासपूर, पिरवाडीसाठी 35 कोटीची योजना हाती घेण्यात आहे.

error: Content is protected !!