शहरातील मंडईत नागरिकांशी संवाद, प्रसिद्ध चहा कट्ट्याला दिली भेट
वाई(भूमिशिल्प वृत्तसेवा): खासदार उदयनराजे भोसले यांनी वाई शहरात प्रचार फेरी काढण्यापूर्वी घाटावरील महागणपतीचे दर्शन घेतले. याप्रसंगी मोठ्या संख्येने कार्यकर्ते त्यांच्यासोबत गणेश आरतीसाठी सहभागी झाले होते.
याप्रसंगी माजी आमदार मदन भोसले भाजपच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सुरभीताई भोसले,भाजपचे वाई विधानसभा अध्यक्ष सागर पवार, शहराध्यक्ष विजय ढेकणे, तालुकाध्यक्ष दीपक ननावरे, युवा सेना अध्यक्ष गणेश सावंत,राकेश फुले आदींची उपस्थिती होती.
महागणपतीचे दर्शन घेतल्यानंतर उदयनराजेंनी वाई शहरांमध्ये पायी फेरी काढली. विवेक भोसले यांच्या समर्थ भवन या निवासस्थानाला त्यांनी भेट दिली. तिथून मंडईतील विक्रेत्यांशी संवाद साधत उदयनराजे प्रसिद्ध चहा कट्ट्यावर पोहोचले. या ठिकाणी छोटेखानी सभा घेण्यात आली. उदयनराजेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
त्यानंतर रविवार पेठेतील शिवप्रतिज्ञा शाळा काळुबाई मंदिर भोईराज गणेश मंडळ श्री मारुती मंदिर या ठिकाणी उदयनराजे यानी भेट दिली. त्यानंतर शेंदुर्जने येथील काळभैरवनाथाचे दर्शन घेतले. प्रमोद जगताप यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
You must be logged in to post a comment.