सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : खासदार उदयनराजे भोसले आपल्या हटके स्टाईलनमुळे नेहमी चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी गणेशोत्सवात डॉल्बी वाजली पाहिजे, अशी आग्रही मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी काल सातारा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांच्या डॉल्बी सिस्टीमचे (लाऊडस्पीकर) उदघाटन करताना उदयनराजेंनी डॉल्बीच्या तालावर थिरकत कॉलर उडवली.
राज्यात पोलिसांनी डॉल्बीला बंदी असल्याचे सांगितले आहे. मात्र खासदार उदयनराजेंनी डॉल्बी वाजवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी गणेशोत्सवात डॉल्बी वाजविण्याची तयारी केली आहे. आपल्या समर्थकांच्या डॉल्बी सिस्टीमचे उद्घाटन करुन उदयनराजेंनी प्रशासनाला सूचक इशारा दिला आहे. यावेळी उदयनराजेंच्या नावाने तयार करण्यात आलेले गाणे डॉल्बी सिस्टीमवर लावण्यात आले होते. उदयनराजेंनी डॉल्बीच्या तालावर थिरकत आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये फ्लाईंग किस देत हातवारे करत कॉलर उडवून प्रशासनाला एक प्रकारे इशाराच दिला आहे.
You must be logged in to post a comment.