सातारा : शहरात पोवई नाका येथे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्वखर्चातून ‘सेल्फी पॉईंट’ उभारला आहे. आज (मंगळवार) सायंकाळी सहा वाजता आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे. त्या आधीच खासदार उदयनराजे भोसले यांनी सेल्फी पॉईंटची पाहणी करून सहकाऱ्यांसमवेत तेथे फोटो काढले.
सातारा नगरपालिका आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमुळे आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यात संघर्ष सुरू आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. पोवई नाका अर्थात छ. शिवाजी महाराज सर्कल येथे ग्रेड सेपरेटरचे काम पूर्ण झाल्यानंतर आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या संकल्पनेतून आणि स्वखर्चातून उभारण्यात आलेल्या ‘राजधानी सातारा’ या सेल्फी पॉईंटचे लोकार्पण मंगळवार दि. ९ रोजी सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे.
त्यातच आज आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी स्वखर्चातून उभारलेल्या ‘सेल्फी पॉईंट’ची खासदार उदयनराजेंनी पाहणी केल्याने राजकीय चर्चेंना उधाण आले.
You must be logged in to post a comment.