सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा नगरपरिषद ही नागरिकांची संस्था आहे. या मातृसस्थेच्या माध्यमातुन जनतेच्या मुलभुत गरजांची पूर्तता करण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न केला आहे. कोरोनाच्या काळात सर्वच खर्चावर बंधने- मर्यादा येत असल्या तरी प्रामुख्याने हद्दवाढ झालेल्या भागाचा मुलभुत विकास साधण्याचा प्रामणिक प्रयत्न सातारा विकास आघाडीच्या माध्यमातुन आम्ही करीत आहोत. त्यासाठी लागणारा निधी राज्य आणि केंद्राकडून उपलब्ध करुन घेणे, नगरपरिषदेच्या स्वनिधीतुन विकास साधणे असे विविध प्रयत्न सुरु आहेत. हद्दवाढ झालेल्या भागाच्या विकासाकरीता कुठेही कमी पडणार नाही, असे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.
सातारा नगरपरिषदेच्या शाहुपूरी भागातील विविध विकास कामांचे भुमीपूजन, लोकार्पण कार्यक्रमात ते अनौपचारित बोलत होते. यावेळी तत्कालीन शाहुपूरी ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य,पंचायत समिती माजी सदस्य संजय पाटील, पंचायत समिती माजी सदस्य सिध्दार्थ निकाळजे, नगरपरिषदेचे विविध समित्यांचे सभापती, नगरसेवक,नगरसेविका, नगरपरिषदेचे अधिकारी, प्रमुख उपस्थित होते.
उदयनराजे म्हणाले, सातारा नगरपरिषद ही अ वर्ग नगरपरिषद आहे. जिल्हयातील सर्वात मोठी नगरपरिषद म्हणून सातारा नगरपरिषदेकडे पाहिले जाते. नुकतीच हद्दवाढ झाल्याने, सातारा नगरपरिषदेच्या हददीचा विस्तार होण्याबरोबरच जबाबदारी देखिल वाढली आहे. नगरपरिषद हद्दीत समाविष्ट झालेल्या भागातील नागरीक पूर्वीपासूनच मनाने सातारा शहराशी एकरुप झालेले होते. पूर्वी देखिल अत्यावश्यक नागरी सेवा या भागात सातारा नगरपरिषद अपवादात्मक परिस्थितीत पुरवित होती. या भागातील संपूर्ण कचरा, सातारा नगरपरिषदेच्या मालकीच्या सोनगांव कचरा डेपोवरच टाकला जात होता. आता हद्दीवाढीमुळे सातारा नगरपालिकेची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे आगामी काळात हद्दवाढ झालेल्या भागातील विकासकामांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
You must be logged in to post a comment.