जिल्हा बँकेत मतदारांना गृहीत धरुन हे मताचे राजकारण : उदयनराजे

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : माझी इतकी मत आहेत, तितकी मतं आहे, असा मी, मीपणा, मीच पाहीजे, हा अहंकार आहे. या अहंकारामुळे जे मतदार आहेत. त्या मतदारांना गृहीत धरुन हे मताचे राजकारण करीत आहेत, असे प्रतिपादन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.

सातारा नगरपरिषदेच्या विविध विकास कामांच्या भुमीपूजन आणि लोकार्पण कार्यक्रमांत पत्रकारांशी वार्तालाप करताना पत्रकारांनी विचालेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना उदयनराजे म्हणाले, सातारा जिल्हयातील निर्णय जिल्हयातच झाले पाहीजेत. बैठक कुठंतरी बोलावली आहे.वास्तविक जे मतदार तुम्हाला मत देणार आहेत, आजपर्यंत मत देत आले आहेत, त्यांची मते-मतांतरे अजमावण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभेसारखी बैठक बोलवली असती तर ते संयुक्तिक ठरले असते. ज्यांनी सहकारी संस्था मोडकळीस आणल्या, संस्थांचे खाजगीकरण केले, अशा व्यक्‍तींना जिल्हा बँकेच्या मतदारांनीच बँकपासून दूर ठेवणे गरजेचे आहे

error: Content is protected !!