सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत घेतलेली भेट ही राजकीय तडजोडीसाठी असून भविष्यात देवाण घेवाणीतून सत्तांतर होऊ शकते अशी शक्यता भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे. येथील शासकीय विश्रामगृह येथे ते पत्रकारांशी बोलत होते.
खासदार उदयनराजे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेण्यापूर्वी अधिवेशन बोलवायला पाहिजे होते. त्यामध्ये चर्चा करायला हवी होती. आता जी भेट झाली त्यामध्ये केवळ देवाण घेवाणच होणार. सध्या राज्यात जे प्रकार सुरु आहेत त्यावरुन असेच वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले. कोण पत्र्यावरून पडत आहे तर कोणाच्या गाडीत काही सापडत आहे. अशा परिस्थितीत सरकारचे काही खरे नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. त्यामध्ये सत्तांतरनंतर काही गोष्टी होऊ शकतात याबाबत चर्चेची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. हा सर्व प्रकार म्हणजे समाजाची चेष्टाच असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याबरोबरच दोन समाजामध्ये वितुष्ट निर्माण करणे आणि भांडणे लावण्याचेच काम केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
You must be logged in to post a comment.