दोन राजेंच्या गळाभेटीने मनोमिलन?

पुणे येथील विवाह सोहळ्यात खासदार उदयनराजे भोसले आणि
विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी गळाभेट घेतली

सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : राजकारणात कधी काया होईल, याचा काही नेम किंवा नियम नाही. काल एकमेकांचे हाडवैरी असलेले नेते दुसऱ्या दिवशी जीवलग मित्र होता. जिवलग मित्र एकमेकांचे शत्रू होतात. त्याची आजपर्यंत अनेक उदाहरणे आहे. त्याचच प्रत्यत सातारा जिल्ह्याच्या राजकारणातही मागील काही महिन्यांपासून सातारकरांना पहावयास मिळत आहे. एकमेकांवर खालच्या भाषेत टिका करणारे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळक आणि भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी तीन महिन्यांत दुसऱ्यांना भेट घेऊन एकमेकांशी हितगुज केले. त्यांनी या दोघांच्या गळाभेटीमागे मनोमिलन तर नाही ना अशी चर्चा रंगत आहेत.

उदयनराजे भोसले राष्ट्रवादीमध्ये असताना रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यामध्ये तूतू-मैमै होत होती. त्यामध्ये जिल्हा बॅंकेची निवडणुक असो वा जिल्हा परिषदेची दोघे एकमेकांच्या विरोधात भूमिका घेत होते. दोघांच्या तक्रारी पक्षाचे नेते शरद पवार यांच्यापर्यंत पोहचल्या. पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष दिले होते. लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंना उमेदवारी देऊ नये, असा आग्रह रामराजेंच्या नेतृत्वाखाली आमदारांच्या शिष्टमंडळाने केली होती. लोकसभा निवडणुकीनंतर रामराजे व शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राष्ट्रवादीशी फारकत घेण्याच्या विचारात असताना उदयनराजे यांनी अवघ्या एका वर्षात आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला. तद्पूर्वी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केला. उदयनराजे राष्ट्रवादीत गेल्याने रामराजे राष्ट्रवादीतच थांबले.

निरा-देवधरच्या पाण्यावरून दोघांनी एकमेकांवर टिका करताना पातळी सोडली होती. रामराजेंनी उदयनराजेंना स्वयंघोषीत छत्रपती अशी टीका केली. तसेच चक्रम आहे असेही म्हटले होते. तर उदयनराजे यांनी रामराजेंचा उल्लेख पिसाळलेलं कुत्रं असा करीत, बरं झालं मी बैठकीतून बाहेर पडलो अन्यथा हे कुत्रं मलाही चावलं असतं, अशा खालच्या शब्दांत उदयनराजेंनी रामराजेंवर हल्लाबोल केला.रामराजे निंबाळकर वयाने मोठे आहेत, म्हणून त्यांचा मान राखला. माझ्या वयाचे असते तर जीभ हासडून बाहेर काढली असती. त्यामुळे दोघांमधील संबंध प्रचंड ताणले होते.

दरम्यान शुक्रवारी पुण्यात एका विवाह सोहळ्यात दोघे एकमेकांच्या समोर आले. त्यांनी गळाभेट करून हास्यविनोद केल्याने राजघऱाण्यातील इतर मान्यवरांच्या चेहऱ्यावर हास्य पसरले. आता मात्र दोन्ही राजेंचे अचानक मनोमलन झाल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. सातारच्या राजकारणा नवी कलाटणी मिळणार का? असाही कयास बांधला जात आहे.

error: Content is protected !!