उदयनराजेंना कोरोनाचा संसर्ग

सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : खासदार उदयनराजे भोसले यांना करोनाची लागण झाली आहे. मागील काही दिवसांपासून ते संसदेच्या पावसाळी अधिवेशनानिमित्त दिल्लीत होते. सध्या त्यांच्यावर पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

चार दिवसांपूर्वी दिल्लीतून परतल्यानंतर उदयनराजे भोसले यांना करोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांना पुण्यातील रूबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

खासदार उदयनराजे यांच्या मातोश्री राजमाता कल्पनाराजे भोसले या सुरुवातीला करोनाबाधित झाल्या होत्या. त्या बऱ्या झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते. मात्र पुन्हा त्यांना त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मातोश्री कल्पनाराजेंना रुग्णालयात दाखल केल्याचे समजल्याने खासदार उदयनराजे दिल्लीहून अधिवेशन सोडून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पुण्यात आले होते. यावेळी उदयनराजे संपर्कात आल्यामुळे त्यांनाही त्रास होऊ लागला होता व काही लक्षण आढळल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आत्ता त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे जवळच्या सूत्रांनी सांगितले. तसेच, पुढील एक-दोन दिवसांत त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात येईल असे देखील त्यांच्या समर्थकांनी सांगितले आहे. तर त्यांच्या मातोश्री राजमाता कल्पनाराजे भोसले यांनाही घरी सोडण्यात आले आहे

error: Content is protected !!