सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : लोकांचे महत्वपूर्ण प्रश्न सोडवण्याची मला खाज आहे. म्हणून मी सुध्दा भरपूर खास असलेला खासदार आहे, असे मिश्किल वक्तव्य भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.
सातारा येथील ग्रेडसेप्रेटरचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने उद्घाटन कार्यक्रम घेणार आहेत. यावर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
उदनराजे म्हणाले, ग्रेडसेप्रेटरच्या उद्घाटनाला शऱद पवार यांनी विनंती करूनही अनेक नेते आले नाही. त्यांनी अनेक वलग्ना केल्या. सातारा येथील ग्रेडसेप्रेटरच्या उद्घाटनासंदर्भात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले होते. ते म्हटले कोवीडच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाला येण शक्य नाही. कार्यक्रम उरकून घ्या, असे सांगितल्यावर मग आपणच उरकून घ्यावं म्हटलं. मी काही कोणाची वाट बघत नव्हतो. काम पूर्ण होण्याची वाट बघतली. काम पूर्ण झाल्यानंतर केलं उद्घाटन. कार्यक्रमाला अनेक रथी महारथी आले असते. भाषणं केली असती. आमच योगदान आहे. आमच्या स्वप्नात आल आणि मान्यता दिली, असे म्हटले असते. लोकांचा कौल घेतला. आणि म्हटलं काढ शटर पहिली गाडी आपलीच गेली पाहिजे. आणि उद्घाटन केले, असेही उदनराजे म्हणाले.
You must be logged in to post a comment.