सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सारखे-सारखे ईडी म्हणजे काय चेष्टा झालीय. पानपट्टीवरील बिडी मिळते ना तशी ईडीची अवस्था झालीय, अशा शब्दात खासदार उदयनराजे भोसले यांनी सक्तवसुली संचालनालयाची (ED) खिल्ली उडविली.
सध्या राज्यात सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपाच्या राजकीय घडामोडींवर खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली असून. सध्याचे राजकीय वातावरण कुणी बिघडवले याचा विचार केला पाहिजे, पण, सध्या मी ते बघायचं बंद केलंय आणि ज्या माकड उड्या चालल्या आहेत, त्या बघत बसतोय. कोण कुणाला मारतंय, कोण कुणाला आत टाकतंय हे बघतोय, अशा शब्दात उदयनराजेंनी निशाणा साधलाय.
You must be logged in to post a comment.