सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : उत्तर प्रदेशातील आग्रा येथे मुघल संग्रहालयला छत्रपती शिवाजी महाराजाचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकतीच केली. त्यांच्या या निर्णयाबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राजमुद्रा भेट देवून योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन आभार मानले.
उत्तर प्रदेशातील आग्रा येथे मुघल म्युझियमला छत्रपती शिवाजी महाराज नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पाच महिन्यांपूर्वी केली. त्यांच्या या निर्णयाचं अनेकांनी कौतुकही केले. या म्युझियमच्या निर्माणासाठी सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजाची आग्र्याहून सुटका या घटनेचा इतिहास शोधण्यासाठी पुरावे जमा करण्यात आले आहेत. जानेवारी २०१६ मध्ये या संग्रहालयाचे भूमिपूजन झाले असून ताजमहालच्या गेटपासून अवघ्या दिड किमी अंतरावर हे संग्रहालय उभं राहणार आहे. सुमारे २०० कोटी रूपये खर्चाच्या या म्युझियममध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मांडला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यानां औरंगजेबने आग्रा येथे कैदेत ठेवले होते. पण शिवाजी महाराजानी यशस्वीपणे आग्राहून सुटका केली. याचा प्रेरणादायी या संग्रहालयात मांडला जाणार आहे.
याप्रसंगी खासदार उदयनराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा भेट देवून योगी आदित्यनाथ यांचा गौरव केला. तसेच सातारा आणि प्रतापगडाला भेट देण्याचे खास निमंत्रण दिले. आपण याआधी एकदाच सातारा येथे आल्याची आठवण सांगून लवकरच प्रतापगडाला भेट देण्याचे आश्वासन दिले. गडावरील भवानी मातेची पूजा करून अफझल खानाला याच मातीत गाडल्याचा इतिहास प्रत्यक्ष जाणून घेण्याचे आश्वासन योगी यांनी दिले. यावेळी खासदार उदयनराजे यांनी योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले.
You must be logged in to post a comment.