कऱ्हाड-चिपळूण रेल्वे मार्गाचे काम लवकर सुरू करावे : उदयनराजे

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा): सातारा जिल्ह्यासह पश्‍चिम महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणाऱ्या कऱ्हाड चिपळूण रेल्वे मार्गाचे काम लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली.

यावेळी उदयनराजे यांनी रेल्वेच्या विविध प्रश्नावर श्री गोयल यांच्याशी सविस्तर चर्चा केली. याप्रसंगी गोयल यांनी साताऱ्यासाठी जास्तीत जास्त रेल्वेचा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

प्रशासकिय मंजूरी मिळालेला सुमारे ३००० कोटी रूपये खर्चाच्या कऱ्हाड चिपळूण रेल्वे मार्गाचे काम लवकरात लवकर सुरू करावे. पर्यटनदृष्ट्या महत्वाचे असलेले सातारा रेल्वे स्टेशनचे नुतणीकरण आणि सौंदर्यीकरण तात्काळ करावे. जेणेकरून जिल्ह्यातील पर्यटनासाठी पर्यटक आकर्षित होतील. सातारा जिल्ह्यातील महागाव येथे रेल्वे खात्याची ५० एकर मोकळी जमीन उपलब्ध असून या जमीनीवर रेल्वेचा स्वत:चा सौरउर्जा प्रकल्प उभा करावा. जेणेकरून निर्माण झालेली वीज रेल्वेच्याच वापरात येईल. आदी सातारा जिल्ह्यातील रेल्वेच्या विविध प्रकल्पांबाबत व मागण्यांबाबत आज रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा केली. याप्रसंगी गोयल यांनी साताऱ्यासाठी जास्तीत जास्त रेल्वेचा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

error: Content is protected !!