उदयनराजेंच्या बुद्धीची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही : शिवेंद्रसिंहराजे

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) :उदयनराजेंच्या बुद्धीचे अविष्कार आणि पराक्रम बघितले तर लोकांमधून निवडून येत आलेली लोकसभा घालवून राज्यसभेत मागच्या दाराने गेले. त्यांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही, अशी टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खा. उदयनराजे यांच्यावर केली आहे.

आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी मध्यंतरी साताऱ्यात नारळ फोडयांची गँग आली असल्याची टीका छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावर केली होती. त्याला काल उदयनराजे भोसले यांनी प्रतिउत्तर दिले. ते म्हणाले होते, काम केली म्हणून आम्ही नारळ फोडतो. पण दिशाहीन झालेले अत्यंत संकुचित वृत्तीची काही लोक असतात, त्यांच्याकडून अपेक्षा करणे म्हणजे त्यांच्यावर अन्याय करण्यासारखे होते. आम्ही कामाचे नारळ फोडतो, केवळ त्यांच्या घराण्याकडे पाहून लोकांनी पैसे गुंतवले होते. आम्ही कोणाची घरे फोडली नाहीत, असा टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नामोल्लेख टाळून केली होती.

त्याला आज उत्तर देताना पत्रकार परिषदेत शिवेंद्रराजे यांनी हल्ला चढवला. आमची बुद्धी लहान असेल पण, खासदार साहेबांची बुद्धी अफाट आणि अचाट आहे, असे आमचे मत आहे, असा टोमणा मारला.

error: Content is protected !!