किरीट सौमय्यांवरील हल्ला झुंडशाहीची नांदी: उदयनराजे

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : माजी खासदार किरीट सोमय्या हे सातत्याने भ्रष्टाचाराची पोल खोलत असल्याने त्यांच्यावर झालेला प्राणघातक हल्ला अतिशय निंदणीय आहे. ही घटना म्हणजे वैचारिक महाराष्ट्रातील लोकशाहीची अधोगती आणि झुंडशाहीची नांदी आहे, असे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.
किरीट सोमय्या यांना पुणे येथे शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की करण्यात आली. यामध्ये दुखापत झाल्याने त्यांना पुणे येथील संचेती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. खा. उदयनराजे यांनी या रुग्णालयात जाऊन किरीट सोमय्या यांची विचारपूस केली
यानंतर प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात उदयनराजे यांनी म्हटले आहे की, सोमय्यांच्या मुद्यांचा विरोध गुद्याने केला गेला असल्याने, लोकशाही संकटात सापडली आहे. असा हल्ला करुन किरीट सोमय्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न झाला आहे. देशातील कोणत्याही व्यक्तीवर अश्या हल्याच्या घटना घडल्यास अश्या घटनेचे कोणीहीयाचे कोणीही समर्थन करु शकणार नाही.  

error: Content is protected !!