सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : गोडोली, सातारा येथे श्रीनिवास पाटील फाउंडेशन व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद सातारा जिल्हा) यांच्या संयुक्त विद्यामाने भरवण्यात आलेल्या ‘उद्योगलक्ष्मी दिवाळी मेळा’चे उद्घाटन संपन्न झाले.
आपल्या सातारा जिल्ह्यातील महिला बचत गट व त्याअंतर्गत लघु-उद्योग व गृह-प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून उत्पादन निर्मिती करणाऱ्या महिला उद्योजक भगिनींसाठी हा विक्री महोत्सव आयोजित करण्यात आला होता. सनबीम आयटी पार्क, गोडोली (सातारा) येथे भरवण्यात आलेल्या या दिवाळी मेळ्यात जिल्ह्यातील ६० गावांमधील ६० हुन अधिक महिला स्वयंसहाय्यता बचत गटांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. बचत गटातील महिला सदस्यांनी तयार केलेल्या वस्तूंच्या स्टॉलचेही उद्घाटन यावेळी करण्यात आले.
याप्रसंगी सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा माधवी कदम, कूपर उद्योग समूहाच्या मनिषा कपूर, प्रीसाईज उद्योग समूहाच्या उषाताई शिंदे, श्री.सारंग पाटील, सौ. रचनादेवी पाटील, सातारा शहर व परिसरातील मान्यवर महिला भगिनी, रोटरी क्लबचे प्रतिनिधी, सातारा परिसरातील समाजसेवी संस्थांचे पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.