सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कराड दक्षिणच्या डोंगरी भागातील जनतेची सोय होण्यासाठी उंडाळे (ता कराड )येथे ग्रामीण रुग्णालयात 30 बेडच्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन सहकार पनण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे हस्ते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी रयत कारखान्याचे चेअरमन ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, कराड प. स चे सभापती प्रणव ताटे, तालुका वैद्यकीय अधिकारी संगीता देशमुख उंडाळे, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. शेखर कोगनुळकर, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, डाँ. जयवंत थोरात, प्राथमिक आरोग्य केंद्र येवतीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष पाटील यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
कराड दक्षिण च्या डोंगरी भागातील जनतेची सोय व्हावी यासाठी उंडाळे येथे तीस बेडचे कोविंड सेंटर उभारत असून सध्या येथे कोविड केअर सेंटर म्हणून कामकाज पाहिले जाईल वैद्यकीय सुविधांचा सुविधांची पूर्तता झाल्यानंतर येथे कोविड सेंटर सुरू होईल असे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. डोंगरी जनतेच्या सोयीसाठी कोविड सेंटर उभारावे अशी या विभागातील लोकांची आग्रही मागणी होती परंतु येथील सुविधांचा अभाव असल्याने कोविड सेंटर उभारले नव्हते परंतु कोरोना चा वाढता प्रसार व भविष्यात दिलेला तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून या ठिकाणी डोंगरी विभागातील जनतेसाठी हे सेंटर उभारले जात असल्याचे पालकमंत्री ना बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
You must be logged in to post a comment.