उंडाळे सामाजीक चळवळीचे केंद्रस्थान : पृथ्वीराज चव्हाण

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : विलासकाकांनी तब्बल ३५ वर्ष विधानसभेत प्रतिनिधीत्व केले. त्याचबरोबर त्यांनी उंडाळे गाव हे महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीचे केंद्र बनवले, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले

माजी मंत्री विलासकाका उंडाळकर-पाटील यांच्या शोकसभेचे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या यशंवतराव चव्हाण सभागृहात ते बोलत होते. यावेळी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई,आमदार महेश शिंदे, शशिकांत शिंदे व मान्यवर उपस्थित होते.

रामराजे म्हणाले, राजकारणात विलासकाकांनी सुरुवातीला मला अनेक वेळा संधी दिली. त्यांनी आयुष्यभर तत्वांशी एकनिष्ठ राहिलेल्या विचार तळागाळात पोहचविणे हीच खरी श्रध्दांजली आहे. सातारा जिल्हा बॅंकच्या वाटचालीत त्यांचे मोलाचा योगदान आहे. त्यांनी घालून दिलेली शिस्तीचे आजही कटाक्षाने पालन केले जाते.

बाळासाहेब पाटील म्हणाले, काकांनी आयुष्यभर पुरोगामी विचारांशी एकनिष्ठ राहून सर्वसामान्यांचे राजकरणार केले. यावेळी कृषीज्ञ बुधाजीराव मुळीक, प्रा. नितीन बानगुडे-पाटील, महेश शिंदे, शशिकांत शिंदे आदींनी मनोगत व्यक्त केले.

error: Content is protected !!