सरकारी नोकरांची पतपेढीवर आदर्श भागधारक पॅनलचे निर्विवाद वर्चस्व

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी मर्यादित सातारा या संस्थेच्या संचालक मंडळाची सन २०२२-२३ ते २०२७-२८ या कालावधीसाठीची निवडणूक पार पडली. त्यामध्ये महसूल, न्याय, आरोग्य,कोषागार तसेच अन्य शासकीय कर्मचा-यांच्या सर्व समावेशक आदर्श भागधारक पॅनलने दणदणीत यश मिळवत संपुर्ण १५ संचालक प्रचंड मतांनी निवडून आले व विरोधी परिवर्तन पॅनलचा संपुर्ण धुव्वा उडविला.

विरोधकांनी संस्थेच्या सभासदांना दिशाभूल करणारी अनेक आश्वासने दिली होती. तरी संस्थेच्या सभासदांनी सर्व खात्यांचा समावेश असलेल्या आदर्श भागधारक पॅनेलच्या सुसंस्कृत, चांगल्या विचारांची कास असलेल्या, संस्थेला सहकार कायदयान्वये चालविणा-या जुन्या जाणकार तसेच नविन तडफदार उमेदवारांना प्रथम पसंतीची मोहोर उमटवून सर्वांना प्रचंड मतांनी निवडून दिले.

आदर्श भागधारक पॅनेलला निवडून आणणेमध्ये प्रामुख्याने आरोग्य खातेच्या श्रीम.सुरेखा चव्हाण, श्री. विठ्ठल भोईटे, श्री. राहूल जगताप,महसूल खात्यातील श्री महेश उबारे श्री. जयंत वीर, न्याय खातेतील श्री. भरत यादव, श्री माधव माने, कोषागार खातेतील श्री पांडुरंग भोसले यांनी प्रचंड कष्ट घेतले.

आदर्श भागधारक पॅनलचे उमेदवार श्री चंद्रकांत कांबिरे, श्री.सागर कारंडे, श्री. संदीप गार्डे, श्री. विक्रम शिंदे, श्री दत्तात्रय खंडागळे, श्री. विनायक पाटील, श्री. संजय बैलकर, श्री. नितीन मोहिते,श्री.विक्रमसिंह मोहिते, श्री. सुनिल सावंत, श्री नितीन क्षीरसागर, श्री सुरेश जाधव हे प्रचंड बहुमताने निवडून आले. तसेच आर्दश भागधारक पॅनेलच्या महिला उमेदवारांमध्ये न्याय खातेच्या सौ.सुनिता रेडेकर, आरोग्य खातेच्या सौ.संगिता कणसे व कोषागार खात्याचे श्री दिलीप जानकर हे यापुर्वीच बिनविरोध निवडून आलेले आहेत.

आदर्श भागधारक पॅनलच्या निवडून आलेल्या सर्व उमेदवारांनी संस्थेच्या सर्व सभासदांचे हार्दिक आभार मानले.

error: Content is protected !!