सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : बुद्रुक या गावात अंगावर दगडी भिंत कोसळून कुसुम मधु महामुलकर या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच मुक्ताबाई कृष्ण महामुलकर, वयाशी पद्मावती, कृष्णा महामुलकर, प्रभावती विश्वास मतकर या तीन महिला गंभीर झाल्या जखमी झाल्या आहेत. जावळी तालुक्यातील या घटनेने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
जावळी तालुक्यामध्ये कुडाळ विभागात गेल्या दहा दिवसापासून अतिवृष्टी स्वरूपामध्ये पाऊस पडत आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात भिंतींना तडे जाणे त्याचबरोबर शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. आज दुपारी अडीचच्या सुमारास अचानक सुरू असणाऱ्या मुसळधार पावसातच दहा फूट उंचीची दगडी भिंत कोसळली व भिंतीच्या शेजारी बसलेल्या प्रभावती मतकर, मुक्ताबाई महामुलकर, कुसुम महामुलकर, पद्मावती महामुलकर यांच्या अंगावर आठ फूट दगडी भिंतीचा मलमा कोसळल्याने चारीही महिला भिंतीखाली गाढल्या गेल्या. यातच कुसुम महामुलकर यांचा डोक्यात मोठमोठी दगडी पडून जागीच मृत्यू झाला. अन्य ३ महिला गंभीर स्वरूपात जखमी झाल्या आहेत.
You must be logged in to post a comment.