सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सतत वाढणारी महागाई… इंधन दरवाढ… वाढती बेरोजगारी… अच्छे दिनाच्या नावाखाली जनतेला आलेले बुरे दिन यामुळे जनतेची मोठी फसवणूक झाली आहे. याचा निषेध करण्यासाठी आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने ‘एप्रिल फूल डे’ चे औचित्य साधून पंतप्रधान मोदींच्या खोट्या आश्वासनांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. आजचा दिवस जगभरात ‘एप्रिल फूल डे’ म्हणून ओळखला जातो.
एकमेकांची फसवणूक करून मजेत हा दिवस साजरा केला जातो. पण भारतात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून जनतेचीच मोठी फसवणूक झाली आहे. केंद्र सरकार ज्या ईडीच्या माध्यमातून विरोधकांना नामोहरम करण्याचा प्रयत्न केला जात आहे, पेट्रोल पंपावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने हे अनोखे आंदोलन केले. मोदी सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत मोदींच्या फसव्या आश्वासनांचा केक कापण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस श्री गोरखनाथ नलवडे, युवक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.