Skip to content
Monday, December 23, 2024
Responsive Menu
Bhumishilp.com
Search
Search
मुखपृष्ठ
सातारा जिल्हा
सातारा
कराड
कोरेगांव
खटाव
माण
खंडाळा
पाटण
फलटण
जावळी
महाबळेश्वर
वाई
महाराष्ट्र
राज्य
देश-विदेश
संपादकीय
आरोग्य
फॅशन
क्रीडा
पर्यटन
ब्लॉग
Home
सातारा जिल्हा
सातारा
‘अनलॉक’ काळात ग्रामीण भागातील रुग्णांत वाढ : गृहमंत्री अनिल देशमुख
सातारा
‘अनलॉक’ काळात ग्रामीण भागातील रुग्णांत वाढ : गृहमंत्री अनिल देशमुख
30th June 2020
प्रतिनिधी
सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : ‘कोरोनाचे संक्रमण वाढू नये यासाठी केंद्र व राज्य शासनाने लॉकडाऊन जाहीर केला होता. आता या लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यामुळे शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाचे संक्रमण वाढत आहे. ते रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागाकडे लक्ष केंद्रीत करुन बाहेरून येणार्या नागरिकांचे संस्थात्मक विलगीकरण करुन चाचणीचे प्रमाण वाढवावे म्हणजे बाधितांची संख्या कमी होईल,’ असा विश्वास गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केला.
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने उद्भवलेली परिस्थिती आणि कायदा व सुव्यवस्थेबाबतची आढावा बैठक सोमवारी गृहमंत्री देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस पालकमंत्री बाळासाहेब पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार दीपक चव्हाण, आमदार महेश शिंदे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आदी उपस्थित होते.
फलटण, जावली तालुक्यात मृत्यूचे प्रमाण जास्त
‘राज्यातील 20 ते 22 लाख परप्रांतीय आपापल्या राज्यात गेले आहेत. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यामुळे उद्योगधंदे पुन्हा सुरू झाले असून परप्रांतीय राज्यात परतत आहेत. त्यामुळे कोरानाचे संक्रमण वाढू नये यासाठी राज्यात परत येणार्यांबाबत दक्षता घेणे गरजेचे आहे. फलटण आणि जावली तालुक्यातील रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त असून हा मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत,’ असे देशमुख म्हणाले.
प्रशासनाच्या कामाचे गृहमंत्र्यांकडून कौतुक
‘परजिल्ह्यातून येणार्या नागरिकांचे संस्थात्मक विलगीकरण करुन चाचणीचे प्रमाण वाढवल्यामुळे बाधितांची संख्या कमी होईल,’ असे सांगतानाच जिल्हा प्रशासन समन्वयाने चांगले काम करीत असल्याचेही ते म्हणाले. बाधितांमध्ये 61 टक्के पुरुष व 39 टक्के महिला आहेत. आजपर्यंत 1 हजार 12 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून यात 21 ते 30 वर्षे वयोगटातील तरुणांचे जास्त प्रमाण आहे. जिल्ह्यात 308 प्रतिबंधित क्षेत्रे आहेत. या प्रतिबंधित क्षेत्रांत शासनाने दिलेल्या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करावी त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांची व गर्भवती मातांची काळजी घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
शासनाकडून लवकरच ‘टॉसिलीझुमॅब’, ’रेमडेसीवीर’ची खरेदी
गंभीर कोरोनाबाधितांसाठी टॉसिलीझुमॅब व रेमडेसीवीर हे औषध शासन खरेदी करणार आहे. कोरोना पार्श्वभूमीवर 55 वर्षांवरील 12 हजार कर्मचार्यांना सुटी देण्यात आली आहे. 50 ते 55 वर्षे वयोगटातील पोलीस कर्मचार्यांना साधे काम देण्यात आले आहे तसेच जिल्ह्यातील पोलीस कर्मचार्यांसाठी नव्याने उभारण्यात येणार्या निवासी संकुलासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असेही गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले.
दरम्यान, बैठकीच्या सुरवातीला जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कोरोना संदर्भात जिल्हा प्रशासन राबवत असलेल्या उपाययोजनांची तर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पोलीस प्रशासनातर्फे राबविण्यात येणार्या उपाययोजनांची माहिती सादर केली. या बैठकीस खासदार श्रीनिवास पाटील तसेच उपस्थित आमदारांनीही वेगवेगळ्या सूचना केल्या.
या बैठकीला अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये यांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
‘30 जूनला मानाच्या नऊ पालख्या पंढरपुरात’
आषाढीवारीसाठी जाणार्या मानाच्या नऊ पालख्या 30 जूनला पंढरपुरात पोचतील. 2 जुलै रोजी विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात भेटीचा कार्यक्रम होईल. 18 ते 20 वारकरी पादुका घेऊन जातील, याचेही नियोजन झाल्याचेही गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले.
Share this:
Click to share on Twitter (Opens in new window)
Click to share on Facebook (Opens in new window)
Click to share on LinkedIn (Opens in new window)
Click to share on Pinterest (Opens in new window)
Click to share on Telegram (Opens in new window)
Click to share on WhatsApp (Opens in new window)
More
Click to share on X (Opens in new window)
Like this:
Like
Loading...
Post navigation
या कोरोनाचं करायचं तरी काय..?
शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मार्च 2021अखेर अद्ययावत : पालकमंत्री
error:
Content is protected !!
Loading Comments...
You must be
logged in
to post a comment.
%d
You must be logged in to post a comment.