छत्रपती कृषी महोत्सव प्रदर्शनातील डॉग शोला अभूतपूर्व प्रतिसाद

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): स्मार्ट एक्स्पो ग्रुपच्या व्यवस्थापन अंतर्गत व श्री. छ. उदयनराजे भोसले मित्र समूह,जय सोशल फाउंडेशनच्या वतीने छत्रपती कृषी २०२३ भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन कृषी,औद्योगिक, वाहन व पशु पक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे .सातारा येथील जिल्हा परिषद मैदानावर हे प्रदर्शन १८ ऑक्टोबर ते २२ ऑक्टोबर या काळात वेळ सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत आयोजित करण्यात आलेले आहे. छत्रपती कृषी औद्योगिक वाहन प्रदर्शन महोत्सव २०२३ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या देशी-विदेशी जातीच्या श्वानांच्या डॉग शोला अभुतपूर्व प्रतिसाद मिळाला.या स्पर्धेसाठी तब्बल २८ प्रकारचे श्वान मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सातारा जिल्ह्यातून या डॉग शोला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला मागील वर्षीही आयोजित केलेल्या या श्वान स्पर्धेमुळे यावर्षी या स्पर्धेसाठी गेले अनेक दिवस महोत्सवा आधीपासूनच विचारणा केली जात होती. हा डॉग शो पाहण्यासाठी मोठ्या संख्येने श्वान प्रेमी जिल्हा परिषद मैदान येथे सकाळपासूनच हजेरी लावून होते.

या स्पर्धेत रणजीत चंद्रकांत शिर्के ,.विपेट, ओमकार मोहित गायकवाड पग,, प्रतीमा हिंदुराव जाधव यांच्या बसिक ॲप्रो तसेच विकास सतीश साळुंखे यांच्या मिनपिन ,अरमान हमराज मुजावर यांच्या शिताझु,,आदित्य बजरंग जाधव यांच्या पिटबुल , तौशिक.शब्बीर शेख यांच्या सायबेरियन हस्की ,रोहित प्रताप घाडगे यांच्या बेल्जियम शेपर्ड ,आकाश सतीश बर्गे यांचा गोल्डन रेट्रिवर, महेश जाधव , गौरव विनोद शेडगे यांच्या बॉक्सर जातीच्या श्वानाने पारितोषिके प्राप्त केली.

या स्पर्धेत कारवान जातीच्या ओंकार मानसिंग किर्दत, शेखर चंद्रकांत उमापे, अजय भीमाशंकर शिंगे यांच्या श्वानानी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवले तर ग्रे हाऊंड जातीच्या श्वान प्रकारात अजित एकनाथ तावरे ,प्रशांत रामचंद्र जाधव, विष्णू बाळकृष्ण साळुंखे यांनी अनुक्रमे तीन क्रमांक मिळवून उत्तेजनार्थ पारितोषिक अनिकेत दादासाहेब जाधव यांच्या श्वानाला देण्यात आले .पामेरियन जातीच्या श्वान प्रकारात साहिल गणेश गोळे ,निखिल अरुण रॉय आणि हेमंत बापूसाहेब निपाण यांना गौरवण्यात आले.

ड्रायव्हर जातीच्या श्वान प्रकारात स्वप्निल चंद्रकांत कारेकर, विकास भीमा कांबळे आणि मयूर अजित होनराव यांच्या श्र्वानाना गौरवण्यात आले.जर्मन शेफर्ड प्रकारात निखिल प्रकाश कापसे ,अनिकेत दिलीप कदम, सुमित संजू देवरुखकर यांना पुरस्कार देण्यात आले. तर डॉबरमन जातीच्या प्रकारात निहाल हैदर अली काजी, होम प्रशांत शिंदे ,हर्षद हनुमंत मोहिते तर ग्रेट डेन जातीच्या प्रकारात आकाश मारुती साळुंखे अमेरिकन बुली जातीच्या प्रकारात गौरव अविनाश जंगम ,लोगो अर्जेंटिना जातीच्या श्वान प्रकारात वैभव भारत चव्हाण ,रॉटविलर जातीच्या प्रकारात आदित्य तानाजी पवार आणि बी गेल जातीच्या प्रकारात कृष्णा महेश शिंदे यांना गौरवण्यात आले.

या डॉग शो कार्यक्रमात तज्ञ परिषद म्हणून पशुवैद्यक विभागाचे डॉ. विजय सावंत ,सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन जिल्हा परिषद महाबळेश्वर येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. विकास अधिकारी ,राजवाडा डॉ.सुनील देशपांडे पशुधन विकास अधिकारी ,डॉ.संदीप जाधव व पंचायत समिती साताराचे पशुधन विकास अधिकारी डॉ .अनिल सपने यांचे प्रमुख उपस्थिती होती .

तब्बल सहा तास चाललेल्या या डॉग शोमध्ये विविध नामवंत श्वानांनी आपल्या मालकांसमवेत आपली प्रात्यक्षिके सादर केल्यानंतर राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले यांच्या हस्ते या सर्व विजेत्या श्वान स्पर्धकांचा त्यांचे मालकांसमवेत स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र व पारितोषिके देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी या शोचे तज्ञ परीक्षकांसमावेत संयोजक सोमनाथ शेटे ,सौ .रेखा शेटे माजी नगराध्यक्षा सौ. रंजना रावत, हेमलता भोसले यांचे सह स्मार्ट एक्स्पो ग्रुपचे पदाधिकारी उपस्थित होते.

खरोखरच स्तुत्य असा हा डॉग शो सर्वच श्वान प्रेमींसाठी छत्रपती महोत्सव हा आकर्षण बिंदू ठरत असून दरवर्षी त्यांच्या या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे.याबद्दल राजमाता कल्पना राजे भोसले यांनी संयोजकांचे आभार मानून त्यांना पुढील वाटचालीसाठी व अशीच प्रदर्शने साताऱ्यात भरवण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!