सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्ह्यात मान्सूनच्या पाऊस जोरदार बसत आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाच्या कोसळधारा बरसत असल्याने काहि ठिकाणचे जनजिवन विस्कळीत झाले आहे. तसेच ओढे नाले, धबधबे ओसंडून वाहू लागल्याने धरण क्षेत्रातही पाण्याची चांगलीच आवक वाढली आहे. उरमोडीतही मुसळधार पाऊस सुरु असल्याने धरणाचे चारही वक्र दरवाजामधून विसर्ग उरमोडी नदी पात्रात सोडण्यात आला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जिल्ह्यात हाहाकार माजवला असून संपूर्ण जनजिवन विस्कळीत केले आहे. परळी खोऱ्यात पावसाने संततधार सुरु ठेवल्याने उरमोडी धरण क्षेत्रात पाण्याची आवक वाढल्याने गुरुवार 17 जून रोजी रात्री 11 वाजता चारही वक्रद्वार 0.25 मी उचलून 750 व विद्युत गृह 200 असा एकूण 950 क्यूसेक विसर्ग उरमोडी नदी पात्रात सुरू करण्यात आला.
तसेच पावसाचा मारा कायम असल्याने पाणी पातळी मध्ये वाढ होत असल्याने शुक्रवार 18 जून रोजी सकाळी 9 वाजता वक्रद्वार क्र 1 व 4 हे 0.25 मी वरून 0.50 मी करण्यात आली. ( गेट क्र 1 व 4 हे 0.50 मी, गेट क्र 2 व 3 हे 0.25 मी) सध्या उरमोडी नदी पात्रात होत असलेला एकूण विसर्ग 1413 क्यूसेक, कालवा 100 क्यूसेक. धरणातून होत असलेला एकूण विसर्ग 1513 क्यूसेक इतका असून याकालावधीत उरमोडी नदीपात्रातून ये-जा करण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
You must be logged in to post a comment.