सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) ः कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सातारा जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून दररोज १५०० पेक्षा जास्त रुग्ण कोरोना बाधित होत आहे. आज दुपारपर्यंत १६६६ रुग्ण कोरोना बाधित तर अनेक बेड, आॅक्सीजन आणि व्हेंटिलेटर मिळत नसल्याने तब्बल ३३ रुग्णांचा मृत्यू झाला. अशा गंभीर परिस्थितीमध्येही नागरिक विविध ठिकाणी गर्दी करीत आहेत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी शासकीय रुग्णालयात लसीकरण करण्यात येत आहे. मात्र, नागरिक या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत. त्यामुळे लसीकरणासाठी आलेल्या रुग्णांना कोरोनाची बाधा होऊन बांधितांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत आहे. कोरोना विरोधात लढण्यासाठी प्रतिबंधात्मक लसीचा वापर केला जात आहे. सध्या ही लस फ्रंटलाईन वर्कर आणि ४५ वर्षांपेक्षा जास्त लोकांना लस दिली जात आहे. मात्र, लसीकरण करणारे रुग्णालयांची संख्या कमी असल्याने ग्रामीण रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसीकरणासाठी मोठी गर्दी होत आहे . मात्र येथे लोकांकडून सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याने या गर्दीतूनच कोरोनाचा प्रसार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सातारा शहरातील राजवाडा येथील कस्तुरबा नागरी आरोग्य केंद्र, गोडोली येथील प्रतापसिंह महाराज आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने सोसिअल डिस्टनसिंग चा फज्जा उडत आहे . या अतिरिक्त गर्दी मुळे आरोग्य कर्मचारी वर्गावर खूप कामाचा ताण वाढत आहे. १ मे पासुन १८ वर्षावरील नागरिकांना कोविड लस देण्यात येणार आहे. त्यामुळे गर्दीमुळे आणखी बाधितांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. यासाठी लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्याची गरज आहे.
You must be logged in to post a comment.