सातारा पालिका फक्त कोरोनाबाधित मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी ? : वंचित आघाडीचा सवाल

सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : कोरोनाबाधित मृतांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. सातारा पालिका मात्र कोरोनाबधित मृत रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्याच्या पलीकडे जाऊन काय करणार आहे का नाही. असा सवाल वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे.

गेल्या एक वर्षांपासून त्याही पेक्षा जास्त काळ संपूर्ण भारत देश कोरोनाशी युद्ध करत आहे. यामध्ये हजारो लोकांनी आपले प्राण गमावले. हजारो कुटुंब उध्वस्त झाली संपूर्ण अर्थचक्र थांबले आहे याचा आपल्या देशाला खूप मोठा फटका बसला आहे. भारतात पहिली लाट आली आणि सगळे जनजीवन विस्कळीत करून गेली. या लाटेतून लोक कशेबशे बाहेर पडत आहेत. तोपर्यंत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घालणे सुरू केले आहे. याचा सगळ्यात जास्त फटका बसला तो महाराष्ट्राला कोरोनाबाधित मृतांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. हे काय थांबायचे नाव घेत नाही. महाराष्ट्रात पुणे मुबंई मध्ये रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणत वाढत असताना शासन व प्रशासन यांच्या योग्य नियोजनमुळे रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे ही खूप समाधानाची बाब आहे.

राज्यकर्ते व प्रशासनान एकमेकांच्या हातात हात घालून ग्राऊंडवर काम करत आहेत याचेच फळ असेल असे वाटते. परंतु सातारा जिल्ह्यात या उलट परस्थिती आहे. कोरोनाबधित रुग्णसंख्या दिवसेदिवस वाढत चालली आहे. याहीपेक्षा वाईट गोष्ट मृत्यू दर खूप आहे रोज दोनच्या पटीत रुग्ण मृत्यू पावत आहेत या सगळ्या गोष्टीकडे इथले प्रशासन व शासन नुसते ढिम्मपणे काम करताना दिसत आहे. परस्थिती आटोक्यात येईल अशा पद्धतीचे काम होताना दिसत नाही.

सातारा जिल्ह्यातील राज्यकर्ते कुठे गायब आहेत हे समजत नाही परंतु सगळ्या महाराष्ट्रात सगळ्या महानगरपालिका ,पालिका रस्त्यावर उतरून लोकांना ज्या ज्या गोष्टीची कमतरता आहे. त्याकडे लक्ष देऊन त्यांच्या गरजा पुरवताना दिसत आहे. परंतु सातारा पालिका मात्र कोरोनाबधित मृत रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्याच्या पलीकडे जाऊन काय करणार आहे का नाही. याची चर्चा सध्या जोरदार सातारा शहरात सुरू आहे. पालिका प्रशासनाने साताऱ्याची वाढती रुग्णसंख्या पाहता किमान 500 बेडचे विलगिकरण व्यवस्था करत कोरोना सेंटर उभे करावे अशी मागणी जोर धरत आहे , होम विलगिकरण मध्ये असणाऱ्या रुग्णांसाठी मदतकक्ष उभारण्यात यावा , यामध्ये त्यांना गोळ्या-औषधे पुरवण्यापासून त्यांची काळजी घेण्यासाठी स्वतंत्र टीम नेमावी त्याच बरोबर बेडची उपलब्धता , रेमडीसीवर उपलब्धता यासाठी सुद्धा लोकांना कशी मदत होईल त्यासाठी यंत्रणा उभे राहणे गरजेचे आहे. सातारा पालिकेने सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी निर्णय घ्यावा लोकांना या कठीण परिस्थितीमध्ये मदतीचा हात द्यावा आणि अंत्यसंस्कार करण्याच्या पलीकडे जाऊन लोकांचा जीव कश्याप्रकारे वाचेल यासाठी यंत्रणा उभी करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे.

error: Content is protected !!