वंचित आघाडीतर्फे शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्ह्याच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात पार पडली.

यावेळी जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई सर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. तदनंतर विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यकर्त्यांनी महामानवांच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

यावेळी जिल्हा महासचिव गणेश भिसे, जिल्हा संघटक सतीश कांबळे, सुहास पुजारी, डी. बी.जाधव, प्रमोद क्षीरसागर, लक्ष्मण नलवडे, जिल्हा उपाध्यक्ष संदिप कांबळे, जिल्हा सदस्य दीपक चव्हाण, दीपक धडचिरे, रिपब्लीकन सेनेचे युवा जिल्हाध्यक्ष अक्षय भोसले,शहर सदस्य मिलिंद कांबळे, शुभम कांबळे, सागर खरात, विकी रणभिसे, अमोल गंगावणे, नवनाथ गायकवाड, रिक्षा युनियन अध्यक्ष शशिकांत खरात, कार्यकर्ते, सदस्य उपस्थित होते.

error: Content is protected !!