शिवराज्यभिषेक साजरा करण्यावरून वंचित बहुजन आघाडीकडून निषेध

संग्रहित फोटो

सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी १ जुन २०२१ रोजी काढलेल्या शिवराज्यभिषेक साजरा करण्याबाबतच्या परीपत्रकाचा तीव्र निषेध करण्यात आला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले कि, महाराष्ट्र सरकारमधील मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोविड संक्रमन काळात राज्यात शिवराज्यभिषेक कसा साजरा करावा या बाबत सविस्तर परीपत्रक काढले आहे.ते पुर्णतः असंविधानीक तसेच छ. शिवाजी महाराज यांच्या विचारधारे विरोधी आसल्याने या परीपत्रकाचा वंचित बहुजन आघाडी जिल्हा सातारा तीव्र शब्दात निषेध करून अशा प्रकारची असंविधानीक परीपत्रके काढली जाऊ नयेत याबाबत आपण खबरदारी घ्यावी अशी मागनी करण्यात येते.

छ.शिवाजी महाराज हे आमचेच नव्हे तर सर्वच राज्याचे देशाचे प्रेरणास्थान आहे. त्यांचा राज्याभीशेक कसा साजरा करावा हे सांगन्याचे काम सरकारचे नाही तसेच ग्रामपंचायत,पंचायत समीती,जिल्हा परिषद ह्या संविधानीक स्वायत्त संस्था आसल्याने तेथे तिरंगाध्वज वेतिरिक्त ईतर झेंडे फडकवने हे असंविधानीक आहे असे असताना शासन अशे परीपत्रक कसे काय काढू शकते याच्यावर विचार व्हावा. तसेच छ.शिवाजी महाराजांचा राज्याभीशेक वैदिक पद्धतीने करन्यास त्या वेळच्या वैदिक पुरोहीतांनी विरोध केला आसताना सुद्धा तो राज्याभीषेक वैदिक पद्धतीनेच सरकारी कार्यालयाच्या समोर साजरा करावा आसे परीपत्रक कसे काय काढू शकते याचा विचार गांभीर्याने करावा.

धर्मनिरपेक्ष अशा संविधानाला अपेक्षीत नसनाऱ्या गोष्टीत सरकार परीपत्रकाच्या माध्यमातून नव नवीन पायंडे का पाडत आहेत आणी महामानवांचा वापर करून समाजात तेढ निर्माण करण्याचे असंविधानीक काम सरकार का करीत आहे असा प्रश्न सर्व सामान्य जनतेला पडला आहे याचा विचार करून अशा असंविधानीक परीपत्रक काढणाऱ्या मंत्र्यांस मंत्री पदावर राहण्याचा नैतीक अधिकार नाही तरी मुख्यमंत्री ठाकरे यांनी याबाबत लक्ष घालून ऊचीत कारवाई करून हे परीपत्रक रद्द करन्यात यावे व लोकांना त्यांच्या विचाराप्रमाणे शिव राज्याभिषेक दिन साजरा करण्याचे स्वातंत्र्य द्यावे अशी मागनी वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने करण्यात येते.

error: Content is protected !!