सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) :पैगंबर मोहम्मद बिल आणि मुस्लिम आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी च्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन करण्यात आले. वंचित आघाडी च्या वतीने जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई, महासचिव गणेश भिसे, उपाध्यक्ष फारुख पटणी, सुहास पुजारी, सतिश कांबळे उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, मुस्लिम समाजाच्या न्याय्य हक्कासाठी वंचित बहुजन आघाडी सातत्याने आवाज उठवत आहे. ५ जुलै २०२१ रोजी विधानभवनावर मोर्चा काढून न्यायालयाने मान्यता दिलेल्या ५ % मुस्लिम शैक्षणिक आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी आणि वंचित बहुजन आघाडीने दिलेले पैगंबर मोहम्मद बिल पास करावे. त्याचाच पुढचा टप्पा म्हणून मुस्लिम समाजाच्या संवैधानिक हक्क अधिकारासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलनाची हाक दिली आहे.
न्यायालयाने मान्यता दिलेले ५ % मुस्लिम शैक्षणिक आरक्षण तात्काळ लागू करण्यात यावे. धार्मिक भावना भडकावून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या कठोर शिक्षा देणारे पैगंबर मोहम्मद बिल वंचित बहुजन आघाडीने शासनाला सुपूर्द केले आहे. ते बिल येणारे अधिवेशनात मंजूर करून तात्काळ तो कायदा लागू करावा. महाराष्ट्र वक्फ बोर्डाच्या मिळकतीमध्ये वाढ करून इनाम व मुअज्जिन आणि खुद्दाम हजरात यांना मासिक वेतन करण्यात यावे. संत विचारांचा प्रसार- प्रचार करणाऱ्या ह-भ-प कीर्तनकार यांना शासनाकडून मासिक वेतन सुरू करण्यात यावे. वक्फ बोर्डाच्या जमिनीवर झालेले अवैध कब्जे हटवून त्या जागेचा अल्पसंख्यांक समाजाच्या उन्नतीसाठी उपयोग करावा सहा सार्थी पार्टी महा ज्योतीप्रमाणे मुस्लिम अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण संस्थेची स्थापना करावी
तरी आमच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार होऊन तात्काळ निर्णय व्हावा अशी मागणी करण्यात येत आहे.याबाबत तात्काळ ठोस निर्णय झाला नाही तर आम्हाला मुस्लिम समाजाच्या प्रश्नासंदर्भात जनतेमध्ये जाऊन जनजागृती करून मोठे राज्यव्यापी जनआंदोलन उभारावे लागेल , यामुळेच कायदा आणि सुव्यवस्था याचा प्रश्न निर्माण झाला तर यास सर्वस्वी शासन व प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी, असा इशारा दिला आहे.
You must be logged in to post a comment.