सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : राज्य सरकारने ओबीसी आरक्षण तसेच मागासवर्गीय पदोन्नती आरक्षणाबाबत अन्यायकारक निर्णय घेऊन ओबीसीचे स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरक्षण आणि मागासवर्गीय पदोन्नती आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला असून त्याविरोधात बुधवारी वंचित बहुजन आघाडीतर्फे आंदोलन करण्यात आले.
यावेळी वंचितचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, संघटक गणेश भिसे यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतील बलुतेदार-अलुतेदार संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयसमोर निदर्शन करण्यात आली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
You must be logged in to post a comment.