‘वंचित’चे असेही एक रक्षाबंधन!

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) :  माजगावकर माळ व मतकर कॉलनी येथील भगिनींनी बहुजन वंचित आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरे केले.

अहोरात्र मदतीला धावणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बहिणीची उणीव भासू नये. यासाठी माझगावकर माळ व मतकर कॉलनीतील महिलांनी वंचितच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना राख्या बांधून आज त्यांच्यासोबत रक्षाबंधन साजरे केले. दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य लाभो, देव त्यांच रक्षण करो, अशी प्रार्थना या बांधवांसाठी महिलांनी देवाकडे केल्याचं यावेळी पहायला मिळालं. तर यातील अनेकांना भाऊ नसल्याने, यावेळी वंचितच्या पदाधिकारी बांधवाच्या रुपाने अनेक भाऊ मिळाल्याचा मोठा आनंद असल्याच्या भावनाही यावेळी महिलांनी व्यक्त केल्या.

यावेळी जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई, महासचिव गणेश भिसे, शहर अध्यक्ष मिलिंद कांबळे, उपाध्यक्ष संदिप कांबळे, दीपक चव्हाण, सतीश कांबळे, उमेश खंडूझोडे, अमोल पाटोळे, शशिकांत गंगावणे, दीपक धडचिरे,शुभम कांबळे, अमोल गंगावणे, बाळू निकम, सचिन सोनवले, रवींद्र शेडगे, अजय पवार, ऋषी जावळे, सुदर्शन मोहिते, राजू बाबर, पप्पू खांडेकर, श्रावण पुलावळे, अभि माने, प्रवीण कदम उपस्थित होते. या अनोख्या रक्षाबंधनाने वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते भारावले.

error: Content is protected !!