वंचित बहुजन आघाडी सातारा पालिका निवडणुकीत तिसरा पर्याय निर्माण करणार : बाळकृष्ण देसाई

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा शहरात वंचित बहुजन आघाडी समविचारी पक्ष-संघटना यांना सोबत घेऊन नगरपरिषद निवडणुकीमध्ये सक्षम तिसरा पर्याय निर्माण करणार, असे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई यांनी जाहीर केले.

प्रसिध्दी पत्रकद्वारे देसाई यांनी म्हटले आहे की, नगरपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजू लागले आहे.सर्वत्र धामधूम सुरू आहे.दोन्ही आघाडीचे उमेदवार तिसरा कोणताही पर्याय निर्माण होऊ नये यासाठी वाट्टेल ते राजकारण करण्याच्या तयारीत आहे.विकास म्हणजे भोपळा , एकमेकांवर आरोप करणे यालाच सातारचा विकास अश्या गोड गैरसमजात दोन्ही आघाड्यांचे नेते आहेत , इथल्या बहुजन समाजाच्या आर्थिक-सामाजिक प्रगतीसाठीचा जाहीरनामा यांच्या डायरीमध्ये नाही अशी परिस्थिती आहे , माणसाच्या मूलभूत गरजा शिक्षण-आरोग्य-रोजगार या पूर्ण करण्यासाठी दोन्ही आघाड्या व त्यांचे नेते पूर्णतः फेल ठरले आहे.

जनतेला तिसरा पर्याय हवा आहे जो त्यांच्या आवाज बनून त्यांचे प्रश्न निकाली काढू शकेल , जनतेचा आवाज म्हणून वंचित बहुजन आघाडी सातारा शहराच्या विकासासाठी सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून , समविचारी पक्ष संघटना यांना सोबत घेऊन नागरिकांच्या हितासाठी नगरपरिषद निवडणुकीत बहुजन समाजाची मोट बांधून समाजातील सर्व छोट्या मोठ्या घटकातील जातींना एकत्र करत एक सक्षम तिसरा पर्याय निर्माण करीत आहे. सातारकर माय-बाप जनतेने आपले मतरुपी आशीर्वाद देऊन वंचित आघाडी समविचारी पक्ष संघटनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे, असे आवाहन केले आहे.

error: Content is protected !!