सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) सातारा तालुक्यातील मौजे वेचले येथील अल्पवयीन मुलांवर लाकडी दांडक्याने मारहाण करून जातीवाचक शिविगाळ करण्याचा निंदनीय प्रकार सातारा जिल्ह्यात घडल्याने आंबेडकरवादी जनतेमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात अजून सुद्धा जातीच्या नावाने हिनवले जाते, मारहाण केली जाते हा प्रकार अतिशय निंदनीय व निषेधार्थ आहे या घटनेचा वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्हा अतिशय तीव्र शब्दात निषेध करीत असल्याचे मत जिल्हा महासचिव गणेश भिसे यांनी
दलित पीडित कुटुंबाची भेट घेतल्यानंतर वेक्त केले.वंचित बहुजन आघाडी पीडित कुटुंबास सर्वतोपरी सहकार्य करणार प्रसंगी समाजास न्याय देण्यासाठी मोठया स्वरूपाचे जनआंदोलन उभारावे लागले तरी उभारू परंतु पीडित कुटुंबास न्याय देऊ असे गणेश भिसे यांनी सांगितले. यावेळी वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्हा उपाध्यक्ष संदिप कांबळे, सामाजिक कार्यकर्ते संभाजीराव आवळे, तुषार वायदंडे, आबा मोरे, अतुल कांबळे, पीडित कुटुंबातील सदस्य, समाजातील तरुण कार्यकर्ते, जेष्ठ नागरिक उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.