वनविभागाच्या हद्दीतील रस्त्यांची कामे मार्गी लावा : आ. शिवेंद्रराजे

 सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा- जावली तालुक्यात काही ठिकाणी वन विभागाची जमीन असल्याने त्या ठिकाणची रस्त्यांची कामे रखडली आहेत. भिलार, उंबरी, आलेवाडी ते मोरावळे हा रस्ता, हुमगांव ते बावधन रस्ता आणि पारंबे फाटा ते माचुतर या तीन रस्त्यांची कामे करताना वन विभागाचा काही भाग येत असल्याने पुढचे काम होत नाही. वन विभागाकडून बांधकाम विभागाच्या प्रस्तावांना तातडीने मंजूरी मिळाल्यास ही कामे पुर्ण होतील. याबाबत त्वरीत निर्णय घ्यावा, अशी सुचना आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली. 
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या उपस्थितीत वन विभाग आणि बांधकाम विभागाच्या झालेल्या संयुक्तीक बैठकीत आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सिंह यांच्यासह मुख्य वनसंरक्षक हाडा, सहायक वनसंरक्षक भडाळे, शितल राठोड, जावली बांधकाम विभागाचे उप अभियंता कृष्णा निकम, पंचायत समितीचे उप अभियंता खैरमोडे आदी अधिकारी उपस्थित होते. 
बैठकीत तीनही रस्त्यांबाबत सविस्तर चर्चा झाली. प्रमुख जिल्हा मार्ग 68 भिलार, उंबरी, आलेवाडी, कुंभारगणी, रेंडीमुरा, मोरावळे या रस्त्यामध्ये वनविभागाची सुमारे 600 मीटर जागा येत आहे. या ठिकाणच्या रस्त्याचे काम मार्गी लागण्यासाठी बांधकाम विभागाने वन विभागाकडे प्रस्ताव पाठवला आहे. सदर प्रस्तावाला जिल्हा वन समितीने मंजूरी दिली आहे. त्याला वरिष्ठ पातळीवर मंजुरी मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी सुचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केली. हुमगांव ते बावधन या रस्त्याची बांधकाम विभागामार्ङ्गत दर्जोन्नती करण्याचा ठराव जिल्हा परिषदेने केला आहे. या रस्त्यामध्येही वन विभागाची सुमारे दीड किलोमीटर जागा येते, याबाबातही तातडीने निर्णय घ्यावा. तसेच पारंबे फाटा, कुसुंबी मुरा, सह्याद्री नगर, गाळदेव ते माचुतर या रस्त्यावर महाबळेश्‍वर तालुका हद्दीत सुमारे 300 मीटर वनजमीन आहे. याबाबत बांधकाम विभागाने प्रस्ताव तयार करुन पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्याची सुचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी बैठकीत केली. सविस्तर चर्चेअंती जिल्हाधिकारी सिंह यांनी तीनही रस्त्यांचे प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याबाबत वन विभागाच्या अधिकार्‍यांनी सुचना दिल्या. 
error: Content is protected !!