नगरसेवक वसंत लेवे यांचे नगराध्यक्षांना प्रत्युत्तर

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा पालिकेच्या प्रशासनाने करोना साहित्य खरेदीत केलेल्या भ्रष्टाचाराचे ठोस पुरावे माझ्याकडे आहेत . नगराध्यक्ष माधवी कदम यांच्याशी मी कधीही आणि कुठेही चर्चा करावयास तयार आहे . त्यामुळे तीस वर्ष राजकारण केलेल्यांना साताऱ्याच्या प्रथम नागरिकाने राजकारण शिकवू नये . दैव कृपेने मला माझ्या व्यवसायातून चांगली कमाई होते मी गेल्या पाच वर्षात आघाडीशी कायम निष्ठा ठेवली, नगराध्यक्षांनी आम्हाला निष्ठा शिकवू नये असा जोरदार टोला नगरसेवक अण्णा लेवे यांनी माधवी कदम यांना लगावला .

लेवे पुढे बोलताना म्हणाले नगराध्यक्ष म्हणतात लेवे यांनी त्यांच्या वॉर्डात अनेक नागरिकांना अडचणीत आणले, माधवी कदम असा एक नागरिक पुराव्यानिशी दाखवावा . माझी व्यावसायिक मिळकत धनलक्ष्मी नावानेच नोंदणीकृत आहे . याची कमाई ही कायदेशीर असून त्याचा मी दरवर्षी योग्य तो कर भरतो .

साताऱ्याच्या नगराध्यक्ष पुण्याला जाणार याची साताऱ्यात चर्चा आहे . कोणाचा कोणामुळे किती गौरव झाला आहे हे उघडपणे सांगायची वेळ आमच्यावर आणू नका .पालिकेच्या सभागृहात तुम्ही माझ्या आरोपांना तेव्हाच फेटाळायला हवे होते मात्र तुम्ही या प्रश्नांवर चर्चा घडविली त्यावेळी आरोग्य विभाग प्रमुख अनुपस्थित होते . मग एका रात्रीत असा काय जावई शोध लागला की जेणेकरून तुम्हाला आमचे आरोप बिनबुडाचे वाटू लागले . भ्रष्टाचाराच्या आरोपाचे पुरावे आहेतच, त्याच्यावर तुमच्याशी कधीही चर्चा करायला तयार आहोत . कोणाची पुण्याई संपत चालली आहे हे आपण सांगायची गरज नाही . आमची पुण्याई आम्हाला जन्मभर पुरणारी आहे . ती आपण स्वतः वॉर्डात येऊन पहावी . आपण आपल्या गौरवास्पद कारकिर्दीचा विचार करावा, असा टोला वसंत लेवे यांनी नगराध्यक्षांना लगावला .

error: Content is protected !!