सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : गेले चार दिवसांपासून महाबळेश्वरमध्ये पावसाची संततधार सुरू आहे.त्यामुळे सर्वत्र पाणीच झाले होते तर येथील प्रसिद्ध वेण्णा तलावातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत होती.आज रविवार दुपारी सव्वा तीन च्या सुमारास वेण्णा तलाव मधील पाण्याने सांडव्यावरुन उडी मारली.आता वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने वाहू लागला आहे.
महाराष्ट्राची चेरापुंजी महाबळेश्वर मध्ये मुसळधार पाऊस कोसळत असून गेले चार दिवस मुसळधार पावसामुळे येथील प्रसिद्ध वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने भरून आज दुपारी ३. १५ वाज सुमारास ओसंडून वाहू लागला आहे. वेण्णा तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे . सांडव्यावरून वाहणाऱ्या जलधारांचे मनोहारी दृश्य पाहावयास मिळत आहे. आज त्याचा आनंद स्थानिकांसह येथे फिरवायला आलेल्या पर्यटकांनी घेतला .
२० जुन रोजी वेण्णा तलाव ओसंडून वाहण्याची गेल्या अनेक वर्षात पहिलीच वेळ आहे. गत वर्षी तो ७ जुलै रोजी वाहिला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून हे पर्यटस्थळ पर्यटकांसाठी बंद होते त्यामुळे वेण्णा तलावातील पाणीसाठा जास्त प्रमाणात वापरला गेला नाही . तसेच मे अखेरीस आलेले तौकते चक्रीवादळासह पडलेल्या मुसळधार पाऊसामुळे वेण्णालेकच्या पाण्याच्या पातळीमध्ये अधिकच भर पडली व त्यात या हंगामात गेले ४ दिवस येथे पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे वेण्णा तलाव भरून आज २० जुने रोजीच ओसंडून वाहू लागला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांसाठी महाबळेश्वर आजपासून खुले झाले आहे त्यामुळे तीन महिन्यानंतर पुन्हा पर्यटकांची मोमोठयाप्रमाणावर गर्दी पहिला मिळाली. नगरपालिकेच्या नोंदीनुसार आज एकदिवसात सुमारे हजार पर्यटकांनी या चेरापुंजीला भेट दिली. हवामान खात्याच्या नोंदी नुसार यावर्षीच्या हंगामात १ जून पासून आजपर्येंत येथे सुमारे ११०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. या वर्षी जून पहिल्या आठवड्यापासूनच येथे मान्सूनचा शुभारंभ झाला ,३ जून रोजी ५१.४ मिमि.पडला , ९ जून – ३४.५ मिमी ,१३ जून – ४२.४ मिमी ,१६ जून ६४.४ मिमी ,१७ जून – २११.८ मिमी,१८ जून – ११०. ६ मिमी , १९ जून रोजी १८५. ३ मिमी,२० जून सकाळी ८ .३० वाजे पर्येंत – ८९. ० मिमी व १ जून पासून आजपर्येंत येथे सुमारे ११०० मिमी पावसाची नोंद झाली आहे .
You must be logged in to post a comment.