पिंपोडे, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : आसनगाव-शहापूर ता. कोरेगाव विकास सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत परिवर्तन पॅनेलने दणदणीत विजय मिळवला. तब्बल पंचवीस वर्षे सत्तेत असलेल्या रयत पॅनेलला धूळ चारली.
सह्याद्री सहकारी बँकेचे चेअरमन पुरुषोत्तम शेठ माने यांच्या नेतृत्वाखाली दत्तात्रेय शिंदे, संतोष शिंदे, प्रभाकर शिंदे, धनाजी शिंदे, गणपत शिंदे, उत्तम गाडे, सुनील शिंदे, नितीन शिंदे, सूर्यकांत शिंदे, हेमंत शिंदे, जगदीश शिंदे, सचिन शिंदे, बाळकृष्ण शिंदे, किशोर शिंदे, तुकाराम काकडे, माजी सरपंच प्रशांत शिंदे, अमोल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आसनगाव-शहापूर सोसायटी निवडणुकीत परिवर्तन पॅनलने ७ – ६ असे वर्चस्व प्रस्थापित केले. परिवर्तन पॅनेलचे विलास पांडुरंग शिंदे, रतन प्रताप शिंदे, संजय एकनाथ शिंदे, राजेंद्र आप्पासो जाधव, अरुण बाबुराव जाधव, बेबी जयवंत शिंदे, लीलावती रामचंद्र शिंदे हे निवडून आले.
विजयी उमेदवारांची कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांच्या आतिषबाजी करीत वाजत गाजत मिरवणूक काढली.
या सर्वांचे विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे मा. अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, जिल्हा परिषद कृषी सभापती मंगेश धुमाळ, कोरेगाव पंचायत समिती उपसभापती संजय साळुंखे, यांच्यासह राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी तसेच आसनगाव – शहापूर विकास सोसायटीच्या सभासद शेतकरी यांनी अभिनंदन केले.
You must be logged in to post a comment.