सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : येथील गुरुवार पेठमधील एका सोसायटीमध्ये पार्किंगमध्ये असलेल्या दुचाकी रविवारी रात्री अज्ञानाने पेटवून दिल्या. यात चार दुचाकींचे नुकसान झाले आहे.
याबाबत माहिती अशी की, साताऱ्यातील वृंदावन सोसायटीमधील रहिवाशांच्या दुचाकी रविवारी रात्री अज्ञातानी पेटवून दिल्या. ही घटना रात्री तीन वाजण्याच्या सुमारास झाली. गाड्या पेटवून दिल्यानंतर संशयितांनी धूम ठोकली. त्यानंतर रहिवाशांनी पार्किंगमध्ये धावधाव करून दुचाकीची आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, चार दुचाकी जळून त्यांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
You must be logged in to post a comment.