भुयारी गटार योजनेसाठी भाजपचे नगरसेवक विजय काटवटे आक्रमक

सातारा : साताऱ्यातील प्रभाग क्रमांक १७ येथील भुयारी गटार योजनेच्या प्रलंबित कामावरून भाजपचे नगरसेवक विजय काटवटे पुन्हा आक्रमक झाले आहेत. ही कामे दहा तारखेच्या आत पूर्ण न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.

भुयारी गटार योजनेच्या कामासाठी प्रभाग १७ मध्ये बरेचसे खोदकाम करण्यात आले होते. संबंधित ठेकेदार मार्च २०१७ पासून काम करत आहेत. या कामामध्ये मनमानी सुरू असून चालढकल सुरू आहे. या वॉर्डातील रस्त्याची व गळती काढण्याची कामे पूर्ण न झाल्याच्या कारणावरून आठवड्यापूर्वी वादावादी झाली होती. इतक्या वादानंतरही प्रलंबित कामे ठेकेदाराने न केल्याने काटवटे यांनी बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले.वाॅर्डात मनमानी कारभार करून जाणीवपूर्वक राजकारण करुन भुयारी गटार योजनेचे काम करण्यास विलंब करण्यात येत आहे. काम करण्यास पाठपुरावा केला असता संबंधित ठेकेदार अरेरावीची भाषा वापरुन काम करण्यास टाळाटाळ करत आहेत. तसेच पालिकेकडे पाठपुरावा करूनही त्यांचा प्रतिसाद मिळत नाही. हे काम दि. १० पर्यंत पूर्ण करण्यात यावे, अन्यथा आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा काटवटे यांनी दिला आहे

error: Content is protected !!