अतिवृष्टीमुळे बाधित कुटुंबीयांना १० हजार रुपये मदत : ना.विजय वडेट्टीवार

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : ‘राज्यातील अतिवृष्टीत आतापर्यंत १५० लोकांचा जीव गेला आहे. गेल्या ४० वर्षांतील सर्वात मोठा पाऊस पडल्याने भूस्खलन, दरडी पडणे अशा दुर्घटना घडलेल्या आहेत. आता या लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न वर्षभरात मार्गी लावला जाईल, असे ग्वाही मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

कोयनानगर येथे मंत्री वडेट्टीवार यांनी पाटण तालुक्यातील आढावा बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

राज्यात भूस्खलनाच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना तातडीने पाच लाखाची मदत देण्यात येईल. तसेच पूर बाधित कुटुंबीयांना १० हजार रुपये मदत देण्यात येणार आहे, असेही मंत्री वडेट्टीवार यांनी यावेळी जाहीर केले.

मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, राज्यातील पुनर्वसनाचा प्रश्न मिटत नाही याचा अर्थ धरणग्रस्तांची जागा गैरमार्गाने बळकावली आहे. तसेच पुनर्वसनात अपात्र असूनही लाभ घेतला असल्यास गुन्हे दाखल करून जमिनी परत घेतल्या जातील.

error: Content is protected !!