सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : किर्तनकार बंडातात्या कराडकर यांची स्थानबद्धतेतून सुटका करण्याच्या मागणीसाठी आज 11 वाजता पायी दिंडी मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा देणाऱ्या व्यसनमुक्त युवक संघाचे सचिव विलासबाबा जवळ यांना मेढा पोलिसांनी स्थानबद्धत केले.
पंढरपूरच्या पायी वारीसाठी आग्रही असलेले आणि महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील अग्रणी बंडातात्या कऱ्हाडकर यांना तापकिरवाडी येथील संकल्प मंगल कार्यालयातून दिघी आळंदी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. शनिवारी सकाळी नऊ वाजता ताब्यात घेऊन त्यांना आळंदीहून कऱ्हाडला आणण्यात आले. कऱ्हाड पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर बंडातात्या कऱ्हाडकर यांना करवडी येथील गोपालन केंद्रात स्थानबद्ध करून ठेवले आहे. कऱ्हाड पोलिसांच्यावतीने येथे पहारा ठेवण्यात आला आहे.
बंडातात्या कराडकर यांची स्थान बद्धतेतून तातडीने सुटका करावी, या मागणीचे निवेदन देण्यासाठी मा. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख यांचे कार्यालय येथे वारकरी संप्रदायातील मंडळी एकत्र येणार होती. तत्पूर्वी मेढा येथून विलासबाबा जवळ यांना मेढा पोलिसांनी ताब्यात घेऊन स्थानबद्ध केले आहे. तसेच अनेक ठिकाणी सातारा जिल्ह्यातील वारकरी आणि युवक यांची धरपकड सुरू झाली आहे. या दंडेलशाही सरकारचा व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र निषेध व्यक्त करण्यात आला.
You must be logged in to post a comment.