तडीपार गुंडाकडून गावठी पिस्तूल व काडतुसे हस्तगत

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : विविध प्रकारच्या 16 हून अधिक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत तडीपार गुंडास सातारा शहर डीबी पथकाने ताब्यात घेतले असून त्याच्याकडून अवैध गावठी पिस्तूल व काडतुसेही हस्तगत केली आहेत. निकेत वसंत पाटणकर (वय 32, रा. चंदननगर कोडोली -सातारा) असे त्याचे नाव आहे.

औद्योगिक वसाहतीसह सातारा शहर परिसरातील विविध हॉटेल व्यवसायिकांकडून खंडणीची मागणी करणे व खंडणी न दिल्यास हॉटेलची मोडतोड करण्यात कुप्रसिद्ध असलेल्या निकेत वसंत पाटणकर या सराईत व तडीपार गुन्हेगारावर तीन महिन्यांपूर्वी एका हॉटेलच्या मोडतोडीचा गुन्हा दाखल झाला होता तेव्हापासून दिले तीन महिने तो फरार होता. विविध ठिकाणी पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र तो त्यांना गुंगारा देत होता.

आज मंगळवारी सकाळी तो जनाई मळाई डोंगराच्या पायथ्याला त्याच्या एका खास मित्रास भेटण्यास येणार असल्याची व त्याच्याजवळ गावठी पिस्तूल व काढतोस असल्याची माहिती गुप्त बातमीदारांकडून पोलिसांना मिळाली होती त्यानुसार सातारा शहर पोलीस ठाण्याचे डीबी पथक जानाई मळाई डोंगर परिसर व चंदन नगर येथे दोन पथकांद्वारे लक्ष ठेवून होते. रात्रीच्या वेळी जानाई मळाई डोंगराकडे जाणाऱ्या रस्त्यावरून निकेत पाटणकर जाताना आढळून आला, मात्र पोलिसांची चाहूल लागताच अंधाराचा फायदा घेऊन तो पळून जाऊ लागला. त्यावेळी पोलिसांनी त्याला चारही बाजूंनी घेरले व त्याच्याकडील एक अवैध गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे त्यांनी ताब्यात घेतली.

अवैध शस्त्र बाळगणे आणि तडीपारी आदेशाचा उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे.

error: Content is protected !!