विमल गार्डनमधील रहिवाशांचा रस्त्यावर ठिय्या

राधिका रस्त्यावरी विमल गार्डन सोसायटीमधील रहिवाशांनी रस्त्यावर ठिय्या मांडला.

सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा ) : येथील राधिका रस्त्यावरील विमल गार्डन या सोसायटीच्या रस्त्यावरून परिसरातील एका व्यक्तीशी वाद सुरू असल्याने नागरिकांना जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे नागरिकांनी रस्ता मिळावा, या मागणी राधिका रस्त्यावर ठिय्या मांडला. तब्बल एक तास नागरिक रस्त्यावर बसून राहिल्याने वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी शाहूपुरी पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर वाहतूक सुरु झाली.

याबाबत माहिती अशी की, सातारा येथील बांधकाम व्यावसायिक सागर प्रभाळे यांच्या विमल गार्डन या सोसायटीला जाणारा रस्त्याची मालकी शेजारीली व्यक्तीची असल्याचे सांगितले. याबाबत त्या व्यक्तीने न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने रस्त्याची जागा शेजारील व्यक्तीची असल्याचे सांगितले. त्यानंतर त्या व्यक्तीने सोसायटीत जाणारा रस्ता खोदला. त्यामुळे सोसायटीमधील रहिवाशांना जाण्या-येण्यासाठी अडचण निर्माण झाली.

त्यामुळे नागरिकांनी राधिका रस्ता या मुख्य रस्त्यावर बसू ठिय्या मांडला. त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. दरम्यान, शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांना आंदोलन मागे घेण्यास सांगितले. मात्र, आंदोलक आपल्या मागणीवर अडून बसले होते. दरम्यान, पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक प्रभाळे यांच्या संपर्क साधून या वादावर तोडगा काढण्याच्या सूचना केल्यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाले.

error: Content is protected !!