सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन गेली ३२ वर्षे पतसंस्थांची नेतृत्व करणारी राज्य पातळीवरील शिखर संस्था आहे. या संस्थेची संचालक मंडळाची निवडणुक नुकतीच बिनविरोध झाली. त्यानंतर झालेल्या बैठकीत पतसंस्था चळवळीत आणि सहकार क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन विनोद कुलकर्णी यांची राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या स्वीकृत संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आल्याचे पत्र पतसंस्था फेडरेशनचे चेअरमन काकासाहेब कोयटे यांनी कुलकर्णींना दिले.
२०११ पासून विनोद कुलकर्णी राज्य फेडरेशनवर काम करत आहेत. २०११ साली सातारा जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे तत्कालीन चेअरमन मानसिंगराव चव्हाण यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर त्यांची निवड झाली होती. २०१६ साली ते फेडरेशनवर बिनविरोध निवडून आले होते. गेली ७ वर्षे फेडरेशनच्या पतसंस्थासाठी असलेल्या क्रेडीट न्यूज या मुखपत्राच्या संपादकपदाची धुरा त्यांनी यशस्वीरित्या सांभाळली होती. राज्य पातळीवर काम करुन पतसंस्थांचे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले आहेत. त्यांच्या या कामगिरीची दखल घेऊन सलग तिसऱ्यांदा त्यांना राज्यपातळीवर काम करण्याची संधी राज्य फेडरेशनचे चेअरमन काकासाहेब कोयटे यांनी दिली आहे.
या निवडीबद्दल कुलकर्णी यांचे आ. श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे चेअरमन काकासाहेब पाटील, व्हाईस चेअरमन राजेंद्र चव्हाण, मानद सचिव अंजली पवार, संचालक अविनाश कदम, शिरीष चिटणीस, नरेंद्र पाटील, सुनील जाधव, सुनील पोळ, किरण जाधव, धनश्री महाडिक, नितीन दोशी, फेडरेशनचे सर्व संचालक, प्रकाश गवळी, अशोक कापसे, राजेंद्र कासट, आणि राज्य फेडरेशनचे संचालक डॉ. रवींद्र भोसले यांनी अभिनंदन केले.
You must be logged in to post a comment.